OMG ! ‘त्या’ बर्निंग सेक्टरमध्ये भारतातला फ़क़्त एकजण; तर जगभरात फ़क़्त 112 जण नोकरदार..!

काळानुरूप जसा जीवनपद्धतीमध्ये बदल होतो तसाच बदल व्यावसायिक क्षेत्रात होतो. असाच बदल होत असताना आणखी एक नवे सेक्टर खुले होत आहे. त्याचे नाव आहे वॉटर टेस्टिंग. होय, ज्या पद्धतीने टी टेस्टिंग, कॉफी टेस्टिंग, वाईन टेस्टिंग, फूड टेस्टिंग असे क्षेत्र आहे. त्याच पद्धतीने आता जगाला वॉटर टेस्टिंग नावाच्या नव्या व्यवसाय व नोकऱ्यांची गरज पडणार आहे.

तुम्ही विचार करत असाल की, बातमी येउपर्यंत तर लाखो बेरोजगार याही क्षेत्रात भरून पडलेले असतील. तर, हे तसे अजिबात नाही मित्रांनो ‘द हिंदू’ वृत्तपत्राच्या ‘बिजनेस लाईन’ या अर्थपत्राने दिलेल्या बातमीनुसार या क्षेत्रात काम करणारा एकमेव पठ्ठ्या सध्या अख्या भारत देशाच्या होल इंडियात आहे. तर, जगभरात फ़क़्त 112 वॉटर टेस्टर आहेत.

गणेश अय्यर नावाचा एकमेव पठ्ठ्या भारतात पाण्याची तपासणी करण्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन आलेला आहे. तोच या क्षेत्रातील पहिला भारतीय माणूस आहे. जर्मनी या युरोपीय देशात doemens academy in graefelfing या संस्थेत यावरील खास अभ्यासक्रम सुरू झालेला आहे. पाण्यामध्ये हलके, फ्रुटी, वूडी अशा पद्धतीच्या चव असतात.

अय्यर यांनी ‘बिजनेस लाईन’ला माहिती देताना म्हटले आहे की, भविष्यात हे एक महत्वाचे क्षेत्र असणार आहे. कंपन्या, हॉटेल, पाण्याशी निगडीत व्यवसाय यामध्ये अनेक संधी असतील. अय्यर हे सध्या Veen या बेव्हरेज कंपनीच्या भारत व भारतीय उपखंड विभागाचे प्रमुख आहेत. पाण्याच्या टेस्टवर सध्या आपल्याकडे विशेष लक्ष अजूनही दिले जात नाही. मात्र, भविष्यात ही एक महत्वाची गरज असणार आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

ता. क. : आपल्याकडे कोणतीही ठोस कल्पना असेल तर आम्ही त्याला साकार करू. कंपनी नोंदणी, ट्रेडमार्क, तंत्रज्ञान सल्ला आणि उद्योग मार्गदर्शन यासाठी आम्हाला ९४२२२१५६५८ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. (सल्ला व मार्गदर्शन मोफत नसेल. तसेच कोणता उद्योग करावा यासाठी सल्ला मागायला अजिबात फोन करू नये. व्यवसाय आपण निवडावा. आपली बौद्धिक व आर्थिक क्षमता आणि जोखीम पत्करण्याची तयारी यानुसार व्यवसाय निवडावा. आम्ही त्यासाठीचे तांत्रिक मार्गदर्शन करू.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here