Fake ई-मेल ओळखण्यासाठी ‘या’ टिप्स येतील कामी; अन्यथा बसेल आर्थिक भुर्दंड

आजकाल सायबर चोरांची संख्या वाढत आहे. या सर्व घटनांमध्ये अनेकांना खरे आणि खोटे ई-मेल ओळखता न आल्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला आहे. एवढेच नाहीतर अनेक शिक्षित लोकही आर्थिक फसवणुकीचे बळी ठरले आहेत. या भुरट्या सायबर चोरांपासून वाचायचे असेल तर बनावट ई मेल ओळखणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणूनच आज आम्ही आपल्याला खोटे मेल कसे ओळखायचे याविषयी सांगणार आहोत.

  1. कधीही आलेल्या ई- मेलची अटॅचमेंट थेट क्लिक करू नका. आधी तो मेल चेक करा. मेल वाचण्यापूर्वी अजून एक गोष्ट समजून घ्या ती म्हणजे मेलमध्ये लिंकचा यूआरएल काय आहे. खरा यूआरएल https ने सुरू होतो, तर बनावट http ने सुरू होतो.
  2. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सायबर चोर हे ई मेलमध्ये चुकीचे स्पेलिंग लिहितात. कुठल्याही कंपनीच्या मेलमध्ये स्पेलिंग किंवा ग्रामरची चूक नसते.
  3. हॅकर्स जगातील दिग्गज कंपन्यांच्या नावाचा आधार घेऊन फसवण्याचा प्रयत्न करतात. अशा ई मेलमधील लिंकवर कधीही क्लिक करू नका, अन्यथा तुमचे अकाउंट रिकामे होऊ शकते. कंपन्या लोकांना थेट ई-मेल पाठवत नाहीत.

या गोष्टी एकदा तपासून घ्या. मेल व्यवस्थित वाचा, त्यानंतरच अटॅचमेंटवर क्लिक करा. यापैकी एखादी गोष्ट तपासताना तुम्ही हलगर्जीपणा कराल तर फुकटचे लुटले जाल.  

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here