बाब्बो… सायबर गुन्हेगारांनी थेट जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिला ‘झटका’; प्रकरण वाचून व्हाल अचंबित

चंद्रपूर :

आजकाल सायबर चोरांची संख्या वाढत आहे. या सर्व घटनांमध्ये अनेकांना खरे आणि खोटे ओळखणे अतिशय अवघड होऊन बसले आहे. फेसबुक खाते हॅक करण्याचे प्रकार एवढ्यात वाढले आहेत. तसेच तिर्हाईत व्यक्तीच्या नावाने नवीन फेसबुक खाते तयार करून आर्थिक गंडा घालण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. याला सामान्य माणसे सहज बळी पडतात. म्हणून बऱ्याचदा मोठ्या लोकांच्या/कंपन्यांचा नावाचा वापर केला जातो. मात्र सरकारी खात्याच्या अधिकाऱ्यांच्या नावाने खोटे फेसबुक खाते तयार करून पैशाची मागणी करण्याचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात घडला आहे.

चंद्रपूर पोलिसांचा सायबर गुन्हे शाखा विभाग अतिशय सक्षम समजला जातो. मात्र या जिल्ह्यात भुरट्या सायबर चोरांनी थेट चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षकांच्या नावाचे बनावट फेसबूक खाते उघडले. मग पुढचे पाऊल उचलत त्या बनावट फेसबूक खात्याला लोक जोडले. या फेसबूक खात्याच्या माध्यमातून नागरिकांना पैशाची मागणी केली गेली असून, त्यासाठी विविध कारणे पुढे केली गेली. दरम्यान अशाप्रकारे पैशाची मागणी करणारे काही कॉल्स या फेसबूक अकाउंटशी जोडले गेलेल्या नागरिकांना आल्यानंतर त्यांनी खुद्द पोलीस अधीक्षकांना याची माहिती दिली. त्यातून हा प्रकार उजेडात आला आहे.

आता या भुरट्या सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे बनावट फेसबूक खाते तयार करणाऱ्या आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे. दरम्यान ‘एकदा फ्रेंड असलेल्या मित्राची पुन्हा फ्रेंड रिक्वेस्ट आल्यास त्याची पडताळणी’ करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here