कामगाराच्या उच्चशिक्षित मुलीने ‘अशा’ प्रकारे केला बळीराजाचा सन्मान; जपली सांस्कृतिक परंपरा

नाशिक : 

बळीराजा म्हणजे कष्टाचे आणि प्रमानिकपणाचे प्रतिक आहे. बळीराजाचा सन्मान करण्यासाठी एका घंटागाडी कामगाराच्या उच्चशिक्षित आणि कलाकार मुलीने एका वेगळ्याच प्रकारे बळीराजाचा सन्मान केला आहे. हंसराज कनोजे यांची कन्या आरती कनोजे हिने तिच्या सहकाऱ्यांसह मार्केट यार्ड येथे बळीराजाची भव्य रांगोळी काढून चळवळीत नवी सांस्कृतिक परंपरा निर्माण केली. शहरातील व महाराष्ट्रातीलही ही बळीराजाची पहिलीच भव्यदिव्य रांगोळी नाशिक मध्ये साकारण्यात आली आहे.

दिवाळी साजरी करत असताना बलिप्रतिपदेला अनन्य महत्त्व असल्याने, शेतकरी बांधव आपल्या बळीराजाची पूजाअर्चा करतात. एका दृष्टीने बळीराजाचे राज्य स्थापित होऊन शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावे ह्याच अपेक्षेने शेतकरी राज्याला स्मरण करत असतात. इडा पिडा टळो, अन बळीचं राज्य येवो अशा घोषवाक्यांनी बळीराजाच्या आठवणीला उजाळाही देतात.

आरतीने मुंबईच्या जे.जे.स्कुल ऑफ आर्ट मध्ये प्रिंटींग टेक्नोलॉजीमध्ये डिप्लोमा केला असून ती याच क्षेत्रात पुढील शिक्षण घेणार आहे. शहरातील व महाराष्ट्रातीलही ही बळीराजाची पहिलीच रांगोळी असून शहरातील विविध सामाजिक संघटनांनी, अनेक राजकीय, सामाजिक मान्यवरांनी व शेतक-यांनी तिच्या कलेचे कौतुक केले. तसेच घंटागाडी कामगारांच्या वतीने आरतीला तिच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here