‘लव्ह जिहाद’वर येणार कायदा; पहा कोणत्या राज्याने घेतला यासाठी राजकीय पुढाकार

हिंदू मुलींची फसवणूक करून किंवा तिला फूस लावून त्यांना धर्मांतर करायला लावण्याच्या घटना देशात वाढत असल्याचे सांगत हा मुख्य राजकीय मुद्दा करण्यात केंद्रातील सत्ताधारी भाजपला यश आले आहे. याच धार्मिकता मानणाऱ्या पक्षाने आता आपल्या ताब्यात असलेल्या मध्यप्रदेश राज्यात लव्ह जिहाद यावरील कायदा आणण्याची तयारी केली आहे.

‘मध्य प्रदेश फ्रीडम ऑफ रिलीजन बिल, 2020’  असे या नव्या कायद्याचे नाव असेल. याबाबत माहिती देताना मध्यप्रदेश राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्र म्हणाले की, पुढील विधानसभा सत्रात हे मंजूर करून घेतले जाईल. त्यानंतर अशा पद्धतीने फसवून किंवा बळजबरीने कोणाचेही धर्मांतर करण्यात आले तर 5 वर्षांची शिक्षा या कायद्यात असणार आहे.

यातील महत्वाचे नियन :

  • धर्मांतर करण्याची सूचना किमान 1 महिना अगोदरच द्यावी लागणार आहे.
  • यासाठी मदत करणाऱ्या किंवा त्यासाठी जबाबदार असलेल्यांना शिक्षेची तरतूद असेल.
  • डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट यांच्याकडे परवागनी घेऊन असे लग्न आणि धर्मांतर करता येणार आहे.
  • ज्यांची फसवणूक झाली किंवा दबाव टाकण्यात आला अशा माणसाच्या आई, वडील, बहिण आणि भाऊ यांचीही तक्रार यासाठी ग्राह्य धरली जाईल.
  • यामध्ये असलेल्या कलमाद्वारे गैर जमानती वॉरंट काढून कारवाई केली जाईल.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here