वॉरन बफे पुन्हा फॉर्मात; पहा कोणात्या सेक्टरमध्ये करीत आहेत मोठी गुंतवणूक

जगभरातील गुंतवणूक बाजाराची दिशा निश्चित करण्याची ताकद असलेल्या सुप्रसिद्ध इन्व्हेस्टर वॉरन बफे यांनी पुन्हा एकदा अमेरिकन शेअर बाजारात काह्रेडीला सुरुवात केली आहे. कोविड 19 आजाराच्या कालावधीत त्यांनी प्रथमच खरेदीबाबत उत्साह दाखवला आहे.

मागील आठ महिन्यात त्यांच्या बर्कशायर हाथवे कंपनीने तब्बल 1300 कोटी डॉलर इतके शेअर विकले आहेत. त्यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांना याचे आश्चर्य वाटत होते. ट्रेडिंग नाही तर इन्व्हेस्टमेंट हीच पैसे मिळवण्याची गुरुकिल्ली असल्याचे बफे यांचे मत आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा दम खाऊन बाजारात खरेदीला सुरुवात केली आहे.

आपल्याच कंपनीच्या शेअर्ससह फार्मा, बँकिंग आणि इन्फर्मेशन टेक्नोलॉजी या सेक्टरमधील कंपन्यांचे शेअर खरेदि करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. भविष्यकालीन अंदाज घेऊन ते गुंतवणूक करतात. त्यामुळे आता जगभरात पुन्हा एकदा या तीन सेक्टरवरील विश्वास वाढण्यास सुरुवात होणार आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here