मका उत्पादकांचीही लुट; मिळेना हमीभाव, केंद्र-राज्य सरकारचे दुर्लक्ष

कोणत्याही पिकाला हमीभाव देण्याची घोषणा करून आपले काम संपले अशाच थाटात केंद्र आणि राज्य सरकारची यंत्रणा कार्यरत असते. कोणत्याही पिकाला हमीभाव हा किमान मूल्याचा अधिकार न देणाऱ्या सरकारच्या दुर्लक्षाने कमाल किंवा रास्तभाव हे स्वप्न बनले आहे. आता मका उत्पादक त्याचाच अनुभव पुन्हा घेत आहेत.

मक्याला यंदा 1850 रुपये क्विंटल असा दणक्यात हमीभाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जाहीर केला. त्या हमिभावाच्या जाहिरातीवर कोट्यावधी रुपये खर्च होण्याइतका त्याचा गवगवा करण्यात आला. भाजपने तर आता शेतकरी कोट्यावधी होणार असल्याच्या थाटात श्रेय घेतले. मात्र, वास्तवात आता भाजपच्या ताब्यात असलेल्या बाजार समितीमध्येही मक्याला हमीभाव मिळत नसल्याचे केविलवाणे चित्र कायम आहे.

मंगळवार, दि. 17 नोव्हेंबर 2020 रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

शेतमालजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/11/2020
राहूरी -वांभोरी—-22122512251225
राहता—-50120013351300
दुधणीहायब्रीड14125512551255
जालनालाल824114014251275
अमरावतीलाल145115012501200
पुणेलाल12185019501900
चोपडालाल250108213171250
पंढरपूरलाल49125013401310
दौंड-केडगावलाल215110014001300
कोपरगावलोकल173105013251250
चांदूर बझारलोकल138119013501221
शिरुरनं. २88125014001350
औरंगाबादपिवळी373110013001200
देउळगाव राजापिवळी16121112511211

संपादन : माधुरी सचिन चोभे  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here