पुन्हा एकदा लॉकडाऊन; म्हणून ‘त्या’ मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला पाठवले पत्र

राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याची कार्यवाही करण्याचा विचार राज्य सरकारने सुरू केला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारला पत्रही पाठवले आहे.

थंडीच्या कालावधीत करोना विषाणूचा प्रकोप वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अशातच आता जगभरात तिसऱ्या कोविड 19 लाटेची शक्यता आहे. त्याला आवर घालण्यासाठी केजरीवाल सरकारने पुन्हा एकदा हॉटस्पॉट भागात लॉकडाऊन लागू करण्यासह लग्न आणि समारंभासाठी फ़क़्त 50 लोक एकत्र येण्याची अट घालण्यासाठीची तयारी केली आहे.

डिजिटल प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये केजरीवाल यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, केंद्र सरकारला यासाठीची परवानगी मागितली आहे. केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून दिल्लीत 750 बेड जास्त वाढवण्याची कार्यवाही केली आहे. एकूणच हिवाळ्यात करोनाच्या संकटाशी दोन हात करायला केजरीवाल सरकार तयार होत आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here