काश्मीरी राजकारण : शहांना मुफ्ती यांनी दिले ‘त्या’ शब्दात उत्तर; दिली मागची आठवण करून

काश्मीर प्रश्न काहीकेल्या सुटण्याची चिन्हे नाहीत. कलम 370 हटवून वर्षे झाली तरी तेथील परिस्थिती सामान्य झालेली नाही. उलट आता तर खूप दिवस तिथे कर्फ्यू असल्याने राजकीय प्रक्रियेला हवा मिळाली आहे. अशावेळी आता सर्व मतभेद विसरून या भागात भाजपचे विरोधक एक होत आहेत. त्यांच्यातील राजकीय टीकाटिपण्णी जोरात सुरू झालेली आहे.

माजी मुख्यमंत्री महेबुबा मुफ्ती यांनी भाजपच्या समवेत त्या राज्यात राज्यशकट हाकला होता. त्यावेळी भाजपला अतिशय प्रिय असलेल्या मुफ्ती यांनीच आता मग गृहमंत्री अमित शाह यांना प्रत्युत्तर दिले आहे. शाह यांनी केंद्र सरकारच्या विरोधात एक होणाऱ्या राजकीय पक्षांच्या आघाडीला देशविरोधी असल्याचे म्हटले होते.

त्यावर मुफ्ती यांनी म्हटले आहे की, आम्ही तुमच्या सोबत होतो तेंव्हा देशप्रेमी होतो. आणि आता इतरांच्या सोबत गेलो की लगेच कसेकाय राष्ट्रविरोधी झालो? भाजप बुद्धिभेद करीत आहे. संविधानातील कलमांकडे दुर्लक्ष करून भाजप रोज देशभरात सत्ता राबवत आहे. अशावेळी जो कोणी विरोधक असेल त्याला ते देशविरोधी असल्याचे सर्टिफिकेट देत आहेत. वास्तवात त्यांनी लव जिहाद, टुकड़े टुकड़े आणि गुपकार गँग यांच्या पल्याड जाऊन देशाची अर्थव्यवस्था, वाढती बेरोजगारी आणि महागाई या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देण्याची खरी गरज आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here