माथेफिरू चिन्यांनी केला ‘तो’ भयानक हल्ला; भारतीयांना दोन ठिकाणांहून मागे हटावे लागण्याचा केला दावा

भारत आणि चीन यांच्यातील सीमारेषा सध्या मोठ्या तापदायक वातावरणात आहे. सीमेवर दोन्ही देशांकडून गोळीबार न करण्याचा करार आहे. मात्र, तरीही भारतीय हद्दीत घुसून कब्जा घेण्याच्या प्रयत्नातील चीनमुळे लडाखमधील सीमाभाग असुरक्षित बनला आहे. आता तर चिन्यांनी चक्क वेगळे अस्त्र वापरून भारतीय सैन्याला त्रास दिला आहे.

 पेइचिंग येथील रेनमिन यूनिवर्सिटी येथील प्रा. जिन कानरोंग यांच्या हवाल्याने द टाईम्स (लंडन) वृत्तपत्राने ही धक्कादायक बातमी प्रसिद्ध केली आहे. त्यात म्हटले आहे की, गाल्वान घाटी भागातील काही टेकड्यांवर भारतीय सैन्याने आपली पकड मजबूत केली आहे. त्यातील दोन टेकड्यांवरून भारतीय सैन्याला मागे हटावे लागले आहे.

होय, लेजर गन या आधुनिक अस्त्रांचा वापर करून चिन्यांनी हे यश मिळाल्याचा दावा केला आहे. माथेफिरू असलेल्या या देशाने भारतीय सैन्याला गोळीबार न करता अशा पद्धतीच्या आधुनिक हत्यारांनी त्रास देऊन या जागा सोडण्यास भाग पाडले आहे.

भारत-चीन यांच्यातील सीमा करारानुसार अशा पद्धतीच्या रासायनिक, जैविक आणि प्रकाश-ध्वनी उर्जेची अस्त्रे एकमेकांवर वापरणे बेकायदेशीर आहे. मात्र, अशा पद्धतीचा जगभरातील पहिला हल्ला करून चिन्यांनी आपली लायकी सिद्ध केली आहे. लेजर किरणांचा वापर केल्याने भारतीय सैनिकांना 15 मिनिटांमध्ये अस्वस्थ वाटून उलट्या आणि चक्कर येण्याच्या समस्या उद्भवल्या. मग गोळीबार न करूनही चीनने भारतीय सैन्याला पाठीमागे जाण्यास भाग पाडल्याचा दावा करण्यात आल्याने जगभरात खळबळ उडाली आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here