ब्रेकिंग : ब्रिटन घेणार ‘तो’ महत्वाचा निर्णय; ऑटो मार्केटमध्ये होणार मोठा भूकंप..!

सध्या कार घ्यायची म्हटले की डीजेल घ्यायची की पेट्रोल यावरून चर्चा सुरू होते. नाही म्हणायला आता कुठे बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक व्हेईकलचीही चर्चा सुरू होत आहे. त्याच चर्चेला आणखी वेग देणारी ही बातमी आहे.

होय, ब्रिटन नावाचा देश पेट्रोल आणि डीजेल या इंधनांवर चालणाऱ्या सर्व कार विक्रीवर बंधन घालण्याच्या तयारीत आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन हे पुढील आठवड्यात या महत्वाच्या निर्णयाची घोषणा करू शकतात. असे झाले तर ही ऑटो सेक्टरमध्ये एक महत्वाची क्रांती असणार आहे. कारण, त्यानंतर बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक व्हेईकलची स्पर्धा खऱ्या अर्थाने वाढेल.

ब्रिटन देशाने अगोदर 2040 मध्ये ग्रीन हाउस गॅस अर्थात पर्यावरणावर दुष्परिणाम करणारे वायू उत्सर्जन कमी करण्याचे वेळापत्रक जाहीर केले होते. मात्र, आता हीच डेडलाईन या देशाने 2035 पर्यंत मागे आणली आहे. त्यासाठी सर्व कार बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक व्हेईकल असणे आवश्यक आहे. त्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेतला जाणार आहे.

BBC आणि फाइनेंशियल टाइम्स यांनी याबाबत बातम्या प्रसिद्ध केलेल्या आहेत. मात्र, त्याचवेळी इंधन आणि विजेवर चालणाऱ्या हाईब्रिड कार विक्रीवर कोणत्याही पद्धतीची बंदी घातली जाणार नसल्याचेही बातम्यांमध्ये म्हटलेले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here