अदानी घेणार ‘त्या’ही कंपनीला ताब्यात; लावली ‘इतकी’ मोठी बोली

सध्या भारतात फ़क़्त दोनच उद्योगपतींचा बोलबाला आहे. एक म्हणजे रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि दुसरे म्हणजे अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी. याच अदानी समूहाने देशातील महत्वाच्या विमानतळावर आपले वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर आता DHFL ही कंपनी ताब्यात घेण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे.

डीएचएफएल अर्थात दिवाण हौसिंग फायनान्स लिमिटेड ही एक महत्वाची कंपनी आहे. मात्र, नोटबंदीमुळे रिअल इस्टेटमध्ये आलेल्या मंदीच्या तडाख्यात ही कंपनी आर्थिक गर्तेत सापडली आहे. याच कंपनीला ताब्यात घेण्यासाठी अमेरिकेतील ओकट्री, भारतीय कंपनी पिरामल एन्टरप्राईज आणि हॉंगकॉंग येथील एचसी लेव्ही यांनी बोली लगावली आहे. त्यामध्ये आता अदानी समूहाने उडी घेतली आहे.

अदानी ग्रुपने याची अधिकृतरीत्या माहिती दिलेली नाही. मात्र, दैनिक भास्कर समूहाने याची बातमी प्रसिद्ध केली आहे. त्यात म्हटले आहे की, अमेरिकेतील ओकट्री यांनी DHFL साठी 33 हजार कोटी रुपयांची बोली लावली आहे. अदानी समूह त्यात आणखी 250 ते 300 कोटी रुपये जास्त देऊन ही कंपनी ताब्यात घेण्यासाठी सरसावली आहे.

एकूण अदानी ग्रुपची सध्याची प्रगती आणि वाढीचा वेग लक्षात घेता ते लवकरच ही महत्वाची कंपनी ताब्यात घेतील असेच चित्र आहे. मात्र, अदानी समूहाने याबाबत अधिकृतरीत्या काहीही माहिती दिलेली नसल्याने त्यांच्या माहितीकडे मार्केटचे लक्ष लागलेले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here