धक्कादायक : करोनाची लस येण्यापूर्वीच निर्माण झाला ‘हाही’ धोका; जगभरात चिंता

कोणतेही उत्पादन किंवा औषध बाजारात येत नाही तोच त्याच्या फसवणुकीचे रॅकेट आणि बनावट माल येण्याचे दरवाजे खुले असतात. करोनाच्या लसच्या बाबतीतही असाच धोकादायक आणि धक्कादायक प्रकार घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ब्रिटनच्या नॅशनल क्राइम एजन्सीने इशारा दिला आहे की, कोरोनाची लस बाजारात उपलब्ध झाल्यानंतर काही प्रमाणात कोरोनाची बनावट लसही बाजारात येण्याची शक्यता आहे. बनावट पीपीई आणि कोरोना टेस्ट किट बाजारात आणण्याचे प्रयत्न यापूर्वीच जगभरात झालेले आहेत. हे मोठे अवैध मार्केट आहे. त्यामुळे बनावट लस बाजारात येण्यापासून रोखण्यासाठी ब्रिटनमध्ये कारवाई सुरू करण्यात आली आहे.

 रशिया आणि चीनमध्ये लसचे वितरण आणि नागरिकांना त्याची मात्रा देण्याचे काम वेगाने सुरू आहे. अशावेळी आणखी काही कंपन्यांच्या लस बाजारात येत आहेत. त्यांच्यातून बनावट लस उत्पादन, वितरण आणि विक्रीचे नवे रॅकेट सक्रीय होण्याचीही शक्यता निर्माण झालेली आहे.

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here