ब्रेकिंग : तर, बिहारमध्ये असतील दोन-दोन उपमुख्यमंत्री; पहा काय असू शकते कारण

बिहारच्या निवडणुकीत भाजपने मोठे यश मिळवले आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या पक्षासोबत त्यांनी या राज्यात पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवली आहे. त्याचवेळी 2025 ची पुढील विधानसभा निवडणूक लक्ष्य करून भाजपने आता या राज्यावर पकड मजबूत करण्याचे धोरणे ठेवले.

त्यासाठीच सध्याचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना केंद्रीय स्तरावर मंत्रिमंडळात स्थान देण्याचे पक्के करताना या राज्यात उत्तरप्रदेश राज्याच्या धर्तीवर दोन उपमुख्यमंत्री देण्याचीही तयारी केली आहे. दैनिक भास्कर आणि दिव्य मराठी या वृत्तपत्रांनी ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

भाजपला मोठे यश मिळाले असले तरीही राष्ट्रीय जनता दल या पक्षाने या राज्यात सर्वात मोठा पक्ष बनण्याची किमया केली आहे. त्या पक्षाला शह देण्यासाठी म्हणून उपमुख्यमंत्री पदावरील व्यक्तीत बदल करताना भाजपने जास्तीचे एक पद देऊन पक्षाला आणखी मजबूत करण्याचीही तयारी केली आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here