ठाकरे सरकारने मनाचे दरवाजेही उघडावेत; टीकेनंतर भाजपने केले ‘हेही’ आवाहन

मंदिर उघडण्यासाठी रस्त्यांवर उतरून आणि ठिकठिकाणी आंदोलन करून रान उठवणाऱ्या भाजपने शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यावरून भाजपवर सोशल मिडीयामध्ये टीका होत असतानाच आता भाजपने इतर प्रश्नांवर मनाचे दरवाजे उघडून राज्य सरकारला जाब विचारण्यास सुरुवात केली आहे.

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटरवर सकाळीच म्हटले आहे की, राज्यातील #मंदीर दरवाजे अखेरीस उघडले आता राज्य सरकारने अहंकारात कुलुपबंद असलेल्या मनाचे दरवाजेही उघडावेत. शेतकऱ्यांना भाव द्यावा, सर्वसामान्यांना न्याय द्यावा आणि जनतेला दिलासा द्यावा

एकूणच आता मंदिर उघडल्यावर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपला शेतकरी आणि कष्टकरी मतदारांच्या समस्यांची जाणीव झालेली आहे. त्यावरून ते कोणत्या पद्धतीचे आंदोलन करणार, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here