पेट्रोलच्या किमतीवरून ‘त्यांनी’ काढले मोदी-अडवाणींचे वय; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी

जगभरात पेट्रोलियम पदार्थांचे भाव कमी असतानाही भाजपने केंद्रातील एकहाती सत्तेतून अर्थार्जनासाठी या पदार्थांच्या किमती भरमसाठ वाढवल्या आहेत. त्यावरून कॉंग्रेसने आता भाजपच्या नेत्यांच्या वयाचे गणित पेट्रोलच्या भाववाढीशी लावले आहे.

छत्तिसगढ कॉंग्रेसचे नेते चुन्नी लाल साहू यांनी ट्विटरवर एक खास गणित मांडून भाजपच्या पेट्रोल दरवाढीवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वय पार करून ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या वयाचा आकडा पार करण्याकडे पेट्रोलच्या रेटने मार्गक्रमण केले आहे.

पेट्रोल-डीजल की क़ीमत मोदी जी की उम्र पार करके आडवाणी की उम्र को छूने जा रही है, अशा पद्धतीने त्यांनी या दोन महत्वाच्या नेत्यांच्या वयाकडे लक्ष वेधताना भारतीयांवर या दरवाढीचा होणारा मोठा परिणाम दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

संपादन : सचिन पाटील  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here