बिहार : उपमुख्यमंत्री पदासाठी भाजपतर्फे कोण; केंद्रातून ‘त्या’ वेगळ्याच नेत्यांचे नावही पुढे येऊ शकते..!

बिहारमध्ये जनता दल युनायटेड आणि भाजप यांनी पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवली आहे. जास्त जागा येऊनही मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली या राज्यात भाजप सत्ताधारी बनणार आहे. मात्र, त्याचवेळी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना हटवण्याची तयारी करून नव्यांना संधी देण्याचीही घोषणा झालेली आहे. त्यामुळे या पदावर भाजपतर्फे कोण, याची अवघ्या देशाला उत्सुकता लागली आहे.

सुशील मोदी यांना केंद्रातील मंत्रिमंडळात स्थान देतानाच राज्यामध्ये गटनेता म्हणून तारकिशोर प्रसाद यांचे नाव भाजपने जाहीर केले आहे. त्यांना उपमुख्यमंत्री हे पद मिळणार असेच बोलले जात होते. मात्र, त्याचवेळी ते मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधी असल्याने आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष त्याच जातींचे असल्याने त्यांच्याऐवजी दुसऱ्या कोणालाही उपमुख्यमंत्री पदावर संधी मिळू शकते अशीच चर्चा आता आहे.

त्यामध्ये उपनेता रेणू देवी, संजय जायसवाल, भूपेंद्र यादव, केंद्रींय राज्यमंत्री नित्यानंद राय यांचीही नावे चर्चेत आलेली आहे. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी भाजपची दमछाक केली आहे. त्यामुळे 2025 च्या विधानसभा निवडणुकीवर लक्ष्य ठेऊन भाजप तेजस्वींना शह देणाऱ्या नव्या नेतृत्वाला प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या समवेत भाजप कोणाला उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी देणार याचे कोडे आणखी जटील झालेले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here