मोदींना पक्षाचा मोठा झटका; पहा बिहार भाजपने नेमका कोणता निर्णय घेतलाय तो

भाजपमध्ये कोणत्याही एका नेत्याला खूप मोठा होऊ न देता त्याचे वेगळ्या ठिकाणी पुनर्वसन केले जात आहे. त्याचाच मोठा झटका उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनाही बसला आहे. आता बिहारमध्ये पुन्हा एकदा पक्षाची सत्ता येत असतानाच मोदींना उपमुख्यमंत्री हे पद न देण्याची पक्षाने तयारी केली आहे.

सुशील मोदी हे बिहार भाजपचे एक महत्वाचे नेते आहेत. आता मात्र, पुन्हा एकदा सत्ता मिळत असताना मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह राज्यात उपमुख्यमंत्री पदावर भाजपचे सर्वात मोठे नेते म्हणून काम करणाऱ्या सुशील मोदी यांना राज्यातील सत्तेत न ठेवता थेट केंद्रात जबाबदारी देण्याची तयारी भाजपने केली आहे.

सुशील मोदी यांना केंद्रात मंत्रिपद देतानाच बिहारचे उपमुख्यमंत्री म्हणून तारकिशोर प्रसाद यांना संधी देण्यात आलेली आहे. सुशील मोदी यांनीही पक्षाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. एकूणच आता बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या मदतीला आता यापुढे उपमुख्यमंत्री म्हणून तारकिशोर प्रसाद हे दिसतील.

जातीय समीकरण पक्के करण्यासह पुढील निवडणुकीत भाजपला एकहाती यश मिळवून देण्याच्या उद्देशाने पक्षाने हा महत्वपूर्ण असा खांदेपालट केला आहे, असे अनेक राजकीय विश्लेषकांना वाटत आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here