मोदींच्या राज्यात अदानींना ‘अच्छे दिन’; संपत्तीत 230 टक्के वाढ, पहा काय म्हटलेय राहुल गांधींनी

सध्या जगभरात रिलायंस ग्रुपचे मुकेश अंबानी यांचा तर, भारतात विचार करता अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांचाच बोलबाला आहे. त्यावरच नेमके बोट ठेऊन जनसत्ता वृत्तपत्राच्या बातमीच्या आधाराने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आहे.

जनसत्ता यांनी बातमीत म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात अदानी यांच्या संपत्तीत तब्बल 230 टक्के इतकी वाढ झालेली आहे. त्यात आणखी पुढे म्हटले आहे की, मोदी 2014 मध्ये पंतप्रधान म्हणून दिल्लीत येताना अदानी यांच्या खासगी विमामाने आलेले होते. अगदी त्यावेळी निवडणुकीच्या प्रचारासाठी अदानी ग्रुपचे विमान मोदी वापरत असल्याचे सर्व जगाने पाहिले आहे.

हाच धागा पकडून राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, तुमच्या संपत्तीत किती वाढ झाली आहे?

एकूणच अदानी आणि मोदी यांची मैत्री जगजाहीर आहे. अदानी यांना मागील पाच-सहा वर्षांमध्ये देशात आणि परदेशात मोठा धनलाभ झालेला आहे. देशातील प्रमुख विमानतळ ताब्यात घेण्यासाठी अदानी यांची कंपनी सरसावली आहे. तसेच नव्या कृषी कायद्यांच्या आधाराने विस्तार करण्यासाठी खास कंपन्या आणि जाळे अदानी ग्रुपने तयार केलेले आहे. त्याबद्दल चर्चा सुरू असते. त्यावरच राहुल गांधी यांनी बोट ठेवले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here