पाकड्यांचा RAW वर आणखी एक गंभीर आरोप; भारताला दहशतवादी ठरवण्यासाठी चालू आहे ‘हा’ अट्टाहास

भारताच्या कुरापती शेजारी असलेल्या पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताच्या विरोधात गरळ ओकली आहे. भारत देशाची गुप्तहेर संस्था रिसर्च & अनालिसिस विंग अर्थात रॉ पाकिस्तानात दहशतवादी कृत्य करीत असल्याचा गंभीर आरोप पाकिस्तानने केला आहे.

पाकच्या लष्कराचे प्रवक्‍ता मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी भारतावर आरोप करताना म्हटले आहे की, पाकिस्तानमध्ये दहशवादी हल्ले करण्यासाठी भारत पैसे देत आहे. एका हल्ल्यासाठी 1 कोटी रुपये भारताकडून दहशतवाद्यांना दिले जात आहेत. भारतीय रॉ संस्थेतर्फे अफगाणिस्तान सीमेच्या भागात 87 दहशतवादी शिबीर चालवण्यात येत आहेत.

एकट्या अफगाणीस्तान भागात भारताचे तब्बल 66 दहशतवादी शिबीर आहेत. त्यामधून पाकिस्तानच्या विरोधात घातपाती कृत्य करणाऱ्या दहशतनाद्यांची निर्मिती केली जात आहे. तब्बल 6 कोटी डॉलर खर्च करून भारत 700 दहशतवादी तयार करीत आहे. प्रत्येक हल्ल्याला 1 कोटी इतके पैसे देऊन पाकिस्तानला त्रास देण्याच्या या कृत्याचे पुरावे आहेत. जागतिक संघटकांना लवकरच हे पुरावे सादर केले जाणार असल्याचे प्रवक्‍ता मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी म्हटले आहे.

भारताने अगोदरच अशा पद्धतीने भारतीय सैन्य किंवा रॉ संघटना काम करीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. जागतिक शांततेसाठी काम करणाऱ्या भारताच्या विरोधात पाकिस्तान फ़क़्त गरळ ओकत असल्याचे आता जगालाही माहिती झालेले आहे. अशावेळी पाकिस्तानला चीन सोडून यासाठी आणखी कोण पाठींबा देणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here