IPL : २ नवे संघ येणार; एक अहमदाबादचा, दुसरा संघ खरेदी करण्यासाठी ‘या’ २ बड्या उद्योगपतींमध्ये टस्सल

मुंबई :

आता पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये आपल्याला २ नवीन संघ दिसण्याची शक्यता आहे. यात पाहिला संघ गुजरात अहमदाबादचा असण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या संघासाठी पुण्यासह कानपूर, लखनौ यांच्या नावाची चर्चा आहे. . जबरदस्त अशी खेळी करत मुंबईने सलग दुसऱ्यांदा आणि आजवर पाचव्यांदा आयपीएलची फायनल जिंकली आहे. 

मुंबईचे आयपीएल स्पर्धेचं पाचवं जेतेपद आहे. मुंबई इंडियन्सने याधी 2013, 2015, 2017, 2019 अशा चारवेळा जेतेपदांवर नाव कोरत यावर्षीही फायनल जिंकली. इंडियन प्रीमिअर लीगच्या 13व्या पर्वाच्या यशस्वी आयोजनानंतर BCCIनं पुढील वर्षी होणाऱ्या IPL 2021 साठी हालचाली सुरू केल्या आहेत. 2021मध्ये होणाऱ्या आयपीएलसाठी लिलाव होणार की नाही, संघ संख्या वाढणार या सर्वांची चर्चा सध्या जोर धरत आहे. 

आयपीएल 2021मध्ये दोन संघ वाढणार आहेत आणि त्यापैकी एक संघ हा अहमदाबादचा असेल, हेही जवळपास निश्चित आहे. या दोन संघांपैकी एका संघासाठी अदानी ग्रुप आग्रही आहे तर  संजिव गोएंका ग्रुप आयपीएलचा नवा संघ खरेदी करण्यासाठी उत्सुक आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

एका संघाची मालकी फायनल झाली आहे, असे समजत आहे. असे असले तरी या दोन्ही उद्योजकांमध्ये आता संघासाठी रस्सीखेच होऊ शकते.  संजिव गोएंका ग्रुपनं 2016 व 2017 च्या आयपीएलमध्या रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघ मैदानावर उतरवला होता आणि त्या संघाला अनुक्रमे सातव्या व दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here