BSNL ने आणली खास ऑफर; पहा ग्राहकांना काय मिळणार आहे फ्री..!

सरकारी टेलीफोन कंपनी म्हणून दबदबा कायम असलेल्या बीएसएनएलने आता नव्या जगाशी जुळवून घेत बदलाची तयारी केली आहे. त्यानुसार दिल्ली आणि मुंबई येथील MTNL ग्राहकांना सेवा देण्यासह नवे ग्राहक जोडण्यास कंपनीने प्राथमिकता दिली आहे.

होय, आपल्या सेवेत सुधारणा करून सगळीकडे फोर जी सेवा देण्याची तयारी कंपनीने केली आहे. तसेच आता ग्राहकांना त्यांनी चक्क मोफत सीम कार्ड देण्याचीही तयारी केली आहे. एअरटेल, जिओ, व्होडाफोन-आयडिया यांना टक्कर देण्यासाठी कंपनीने ही खास स्कीम जाहीर केली आहे.

असे सीम घेण्यासाठी ग्राहकांना 28 नोव्हेंबर 2020 रोजीच्या आत ग्राहक सेवा केंद्रातून सीम कार्ड घ्यावे लागणार आहे. एन्ट्री लेव्हल ब्रॉडबँड सेवेला अपग्रेड करतानाही असे सीम कार्ड मोफत मिळणार आहे.

तसेच सीम घेतल्यावर 100 रुपयांचे रिचार्ज केले की सीम कार्ड घेण्यासाठी लागणारे 20 रुपये माफ होणार आहेत. अशा पद्धतीने नवे ग्राहक जोडण्यास प्राधान्य देऊन कंपनीने ही स्कीम आणली आहे.

संपादन : माधुरी सचिन चोभे  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here