रिलायन्स रिटेलने दिले ‘एवढे’ पैसे; खरेदी केला ‘या’ कंपनीचा 96% हिस्सा

मुंबई :

रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेड (आरआरव्हीएल) ने अर्बन लेडर होम डेकोर सॉल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड (अर्बन लेडर) कंपनीचा 96% हिस्सा मिळविला आहे. रिलायन्स रिटेल वेंचर्स ही देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजची (आरआयएल) सहाय्यक कंपनी आहे. त्यांनी अर्बन लेडर 182.12 कोटी रुपयांमध्ये विकत घेतले आहे. हा करार रोख रकमेने झाला आहे.

या करारानुसार, आरआरव्हीएलकडे अर्बन लैडरचा उर्वरित हिस्सा खरेदी करण्याचा पर्याय आहे. जर आरआरव्हीएलने उर्वरित भागभांडवल खरेदी केले तर कंपनीमधील तिचा भाग 100 टक्के असेल. अर्बन लैडरमध्ये आणखी 75 कोटी रुपये गुंतविण्याचा प्रस्ताव आहे. ही गुंतवणूक डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याची माहिती ईकॉनॉमिक टाईम्सने दिली.

अर्बन लैडरच्या खरेदीमुळे रिलायन्स रिटेलची डिजिटल व्यासपीठावर उपस्थिती वाढेल. त्याच्या उत्पादनांची व्याप्तीही वाढेल. रिलायन्स इंडस्ट्रीज गेल्या काही काळापासून डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपली उपस्थिती वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. अर्बन लैडरच्या व्यवहारासाठी कोणत्याही नियामक मंजुरीची किंवा सरकारच्या मंजुरीची गरज पडणार नाही.

अर्बन लैडर 8 वर्षांपेक्षा जास्त जुनी कंपनी आहे. या कंपनीची सुरुवात 17 फेब्रुवारी 2012 रोजी झाली. अर्बन लेडर फर्निचर आणि सजावटीच्या उत्पादनांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म चालविते. तसेच देशातील बर्‍याच शहरांमध्ये रिटेल स्टोअर चेन आहेत. आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये याची ऑडिट उलाढाल 434 कोटी रुपये होती.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here