भारतात पब्जीचा कमबॅक; ‘त्या’ देशाच्या कंपनीकडून 750 कोटी डॉलरची गुंतवणूक

दिल्ली :

भारतात पब्जीचा कमबॅक करणार असल्याचे चित्र लवकरच दिसत आहे. भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि माहितीची गोपनीयता, सुरक्षेच्या मुद्द्यावरून भारतात पब्जीला बंदी आणली होती. पब्जी, tiktok अशा अनेक प्रसिद्ध पण चीनी असणाऱ्या अॅपवर बंदी आणली गेली. जुलै महिन्यात साधारण १०० पेक्षा जास्त अॅपवर बंदी आणल्याने काही कंपन्यांनी इकडचा गाशा गुंडाळला तो कायमचा मात्र पब्जी आणि tiktok भारतात पुन्हा बस्तान बसवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कारण त्यांच्या व्यवसायात भारताचा फार मोठा हात आहे.

आता चीनमधील कंपनीशी मूळ कंपनीचा कसलाही संबंध नसल्याचे दक्षिण कोरियातील कंपनीने म्हटले आहे. आता द. कोरियातील पब्जीच्या मूळ कंपनीने भारतामध्ये उपकंपनी स्थापन करण्याचे ठरविले असून त्यासाठी 750 कोटी डॉलरची गुंतवणूक करण्यात येणार आहे. भारतीय हितसंबंधांना कसलीही बाधा न आणता व्हिडिओ गेम, मनोरंजन इत्यादी क्षेत्रात पब्जी काम करणार असल्याचे सांगण्यात आले.

कंपनीने म्हटले आहे की, पब्जी इंडिया भारतामध्ये सुरुवातीला 100 कर्मचाऱ्याची नियुक्‍ती करणार आहे. पब्जीचे नवे ऍप सुरक्षित असेल. त्याचबरोबर भारतीय हितसंबंधाशी कसलेही तडजोड केली जाणार नाही. भारतातील ग्राहकांच्या गरजा ध्यानात घेऊन आम्ही पब्जीमधील गेम विकसित करणार आहोत.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here