सावधान! झोपेत घोरण्याची तुम्हालाही आहे समस्या; तर हे नक्कीच वाचा

अनेकांना झोपेत घोरण्याची सवय असते. काही जण एवढ्या मोठ्याने घोरत असतात की त्यांच्या घोरण्याच्या आवाजामुळे सगळे घर उठते. ज्या घरात बाळ असते त्या घरात तर घोरणारी मंडळी नेहमी ओरड खात असतात. कारण त्यांच्या आवाजामुळे बाळाला कधीच झोप लागत नाही. पण सावधान! काही वेळा घोरणे आरोग्यास हानिकारक देखील ठरू शकते. झोपेत घोरण्याच्या या सवयींमुळे अनेक शारीरिक व्याधी उदभवू शकतात.   

या व्याधी उद्भवण्याची आहे समस्या :-

  • उच्च रक्तदाब
  • हृदयविकार
  • श्वसनरोग
  • पक्षाघात

म्हणून निर्माण होते घोरण्याची समस्या :-

– अनियंत्रित वाढलेले वजन
– आनुवांशिकता
– साठी उलटून गेल्यानंतर निद्राश्वसनरोग होण्याची शक्यता अधिक असते
– पुरुषांमध्ये १७ इंचाहून अधिक तर स्त्रियांमध्ये १६ इंचाहून अधिक लठ्ठ असणारी मान
– अतिधुम्रपान 

घोरण्याच्या त्रासामुळे अनेक व्याधी उद्भवू शकतात त्यामुळे तुम्ही या समस्याबाबत बेफिकीर राहू नका. या समस्येकडे वेळीच लक्ष द्या.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here