असे बनवा ‘पालक कणिक शंकरपाळे’; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा

दिवाळीचा सण आलेला आहे. जोरदार फराळ, प्रचंड उत्साह आणि गडबड आहे सगळीकडे… या दरम्यान आपण खाऱ्या आणि गोड शंकरपाळे केले असतील. येता जाता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सबंध महाराष्ट्राला आवडणारा असा हा पदार्थ आहे. आज हाच पदार्थ वेगळ्या पद्धतीने कसा करायचा हे आम्ही आपणास सांगणार आहोत. जाणून घेऊयात ‘पालक कणिक शंकरपाळे’ बनवण्याची रेसिपी…

साहित्य घ्या मंडळीहो….

 1. 1 कप कणिक
 2. 100 ग्रॅम पालक
 3. 1/2 टीस्पून मीठ
 4. 1/2 टी स्पून ओवा
 5. 1/2 टी स्पून तिखट
 6. 1 टेबलस्पून मोहन
 7. तळणासाठी तेल

साहित्य घेतलं का… करा की बनवायला सुरुवात

 1. कणिक मिक्सरवर अर्धा मिनिट फिरवुन घ्यावी आणि पालक प्युरी करून घ्यावी.
 2. आता कणकेमध्ये ओवा, तिखट,मीठ व मोहन घालुन मिक्स करून घ्यावे. मुठ वळेल असे करावे. त्यावर पालक प्युरी घालुन मळुन घ्यावे.
 3. आवश्यकता भासल्यास थोडे पाणी वापरून घट्ट गोळा करून पाच दहा मिनिट झाकुन ठेवावा. आता नेहमीप्रमाणे शंकरपाळे तयार करावेत.
 4. गरम तेलात मध्यम आंचेवर तळुन घ्यावेत.
 5. आपले चवदार ‘पालक कणिक शंकरपाळे’ तयार आहेत.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here