अशी बनवा ‘विदर्भ स्पेशल पुरणपोळी’; रेसिपी वाचा एका क्लिकवर

दिन दिन दिवाळी. या सणाला खा चवदार पुरणपोळी… पुरणपोळी हा अस्सल मराठमोळा पदार्थ आहे. एखादा सण किंवा उत्सव आहे आणि घरी पुरणपोळी बनलेली नाही, असे सहसा कधीच घडत नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सबंध महाराष्ट्राला आवडणारा असा हा पदार्थ. मस्त भरपूर पुरण, खुसखुशीत अशी ही पुरणपोळी, कटाची आमटी, गुळवणी, दुध किंवा गरमागरम तूपाबरोबर खाल्ली कि अगदी मन तृप्त करते. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती वापरून पुरणपोळी केली जाते . जसं जळगावमध्ये हातावर पोळी करून उलट्या माठावर किंवा घमेल्यावर पुरणपोळी करतात. आज आपण जाणून घेणार आहोत ‘विदर्भ स्पेशल पुरणपोळी’ कशी बनवायची ते.

साहित्य घ्या मंडळीहो….

 1. 1 वाटी चणाडाळ
 2. 1 वाटी साखर
 3. 1 वाटी मैदा
 4. 1 टीस्पून मीठ
 5. 1 टीस्पून वेलची पावडर
 6. 1 टीस्पून जायफळ (किसून)
 7. 1/2 वाटी साजूक तूप

साहित्य घेतलं का… करा की बनवायला सुरुवात

 1. चणा डाळ एक तास भिजत ठेवणे. नंतर कुकरमध्ये लावताना किंचित हळद टाकून पाच शिट्टी करून घेणे. हळद टाकल्याने पूर्ण कलर छान येईल.
 2. डाळ शिजली की गॅस वर ठेवून पाणी असल्यास आटवून घेणे. आणि मग साखर टाकून साखर वितळेपर्यंत शिजवून घेणे.
 3. पुरणाची पारी बनवण्यासाठी मैद्यात किंचित मीठ, दोन चमचे तेल टाकून छान मऊ मळून घेणे. गोळा एक तास रेस्टला ठेऊन द्या.
 4. पुरणयंत्रातून पुरण काढून घेणे. नंतर त्यात एक चमचा तूप, वेलची पावडर,जायफळ किसून मिक्स करून घेणे.
 5. आता पातळशी पोळी लाटून घेणे आणि त्यावर एका साईडला पुरण भरून हाताने थापून घेणे.पोळीचे कडे पॅक करून घ्यायचे.
 6. मग तुपावर दोन्ही साईडने सोनेरी-विटकरी रंग येईपर्यंत शेकून घ्या.
 7. आपली पुरणपोळी तय्यार…

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here