तर भाजपला बसणार मोठा धक्का; महाराष्ट्रातील ‘हा’ पक्ष भाजपशी काडीमोड घेण्याच्या तयारीत

मुंबई :

भाजप विरोधीपक्षाच्या नेत्यांना तात्पुरते जवळ करते आणि त्यांच्या उपयोग संपला की त्यानं  डावलले जाते, असा आरोप भाजपवर नेहमीच केला जातो. अशीच एक घटना आता महाराष्ट्रात घडताना दिसत आहे. माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी आता भाजपप्रणीत आघाडीशी काडीमोड घेऊन पश्चिम महाराष्ट्रात स्वतंत्र राजकीय चूल उभारण्याची तयारी सुरु केली आहे.

राजकीय निरीक्षक आणि सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार ‘सदाभाऊ खोत यांची राजकीय उपयुक्तता संपुष्टात आल्याने भाजपने त्यांना जिल्ह्याच्याही राजकारणातून डावलण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप खोत यांच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. त्याचीच दखल घेत सदाभाऊ आपली वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत आहेत.

राजू शेट्टींनी जेव्हा भाजपला दे धक्का केला तेव्हा राजू शेट्टी यांचे पंख छाटण्याचे काम भाजपने केले. त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे सदाभाऊ खोत यांचा पाठींबा घेतला. मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी खोत यांना जवळ केले. नंतर सदाभाऊ यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान दिलं होतं. परंतु आता आता भाजपकडून त्यांना डावललं जात आहे.   

न्यूज 18 लोकमतने दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयाविरोधात सदाभाऊ खोतांनी जहरी टीका केली होती. त्यानंतर भाजप पक्षश्रेष्ठींचे खोत यांच्यावरील प्रेम कमी झाल्याचं दिसत आहे. इस्लापूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्याशी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सूर जुळल्यानंतर खोत यांच्याकडे राजकीयदृष्ट्या कानाडोळा करण्याचा पवित्रा भाजपनं घेतला आहे. त्यामुळे सदाभाऊ खोत यांना आपली राजकीय प्रतिष्ठा गमावल्याचं जाणवू लागल्यानंतर त्यांनी भाजपपासून दूर होण्याचे राजकीय संकेत दिले आहेत.     

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here