आजवर आपल्याला लाजाळू या ववनस्पतीचे जास्त कौतुक राहिलेले आहे कारण तिला स्पर्श करताच ती आपले पाने मिटून घेते. तिच्या या वेगळ्या गुणामुळे आपल्याला ती लक्षात राहते. आपण आपल्या घराच्या आजूबाजूला नेहमीच रोपटे लावतो, त्यांची जपणूक करतो. कारण ते आपल्यासाठी ऑक्सिजन देतात. सगळीच झाडे आपल्याला फायदेशीर असतात. मात्र काही झाडांच्या बाबतीत हा आपला गैरसमज ठरू शकतो, कारण जगात काही वनस्पती या हानिकारक आहेत. आज आम्ही आपल्याला एका अशा वनस्पतीविषयी सांगणार आहोत जिचे माणसाच्या संपर्कात येणे कोबरा सापाच्या विषापेक्षाही घातक आहे. कारण या वनस्पतीने इजा केल्यास त्यावर उपाय काय करायचा, याविषयी माहिती नाही. संशोधन केले आहे मात्र काही ठोस असे सापडलेले नाही. जाणून घ्या या ‘जाइंट होगवीड’ या वनस्पतीविषयी :-
या वनस्पतीचे शास्त्रीय नाव हेरॅकलियम मॅन्टेगाझियानम आहे, या झाडाला किलर ट्री (Killer Tree) म्हणून सुद्धा ओळखल्या जाते. ही वनस्पती दिसायला सुंदर असल्याने लोक तिला सहज स्पर्श करू शकतात. मात्र त्यानंतर २ दिवसाच्या आतच याचे हम्भीर दुष्परिणाम दिसू लागतात. हाताला फोडे येणे, त्वचा आतून जळू लागणे आणि नंतर मोठ्या जखमा होणे, असे याचे तीव्र स्वरूप आहे. डॉक्टर या वनस्पतीवर बोलताना सांगतात कि या वनस्पती वर कोणत्याही प्रकारचे औषध उपलब्ध नाही.
न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, मिशिगन, पेनसिल्व्हेनिया, ओहायो, मेरीलँड आणि हॅम्पशायर या शहरांमध्ये ‘जाइंट होगवीड’ ही वनस्पती आढळून येते. या वनस्पतीला स्पर्श केल्यावर कित्येक दिवस माणसाला उन्हात जातं येत नाही कारण त्यामुळे शरीरातील जळजळ वाढण्याची शक्यता असते.
संपादन : स्वप्नील पवार
- त्यामध्ये भारताची फ़क़्त ओएनजीसी; युरोप व अरबस्तानातील दहा कंपन्यांचा वाटा 45 टक्के.!
- पांढरेच नाही तर रंगीतही सोने; पुन्हा फुलणार भारतात रंग, पहा नेमके काय संशोधन झालेय ते
- पुणे, वडूज, सांगलीत ज्वारीने खाल्लाय भाव; वाचा महाराष्ट्रात कुठे व किती आहे भाव
- टोमॅटो मार्केट अपडेट : पहा, आजचे ताजे बाजारभाव
- कांदा मार्केट अपडेट : पहा, आजचे लाल व उन्हाळचे भाव