ब्रेकिंग : एकनाथ खडसेंच्या कुटुंबातील ‘ते’ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह, खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल

जळगाव :

राज्यात कोरोनाचा वेग जरी मंदावला असला तरी, कोरोना होण्याचे सत्र सुरूच आहे. कोरोनाला अद्याप आळा बसलेला नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी नुकतीच कोरोनावर मात केली. अशातच भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे.

रोहिणी खडसे यांनी स्वतः ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. प्रकृती उत्तम असून खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल होत असल्याची माहितीही खुद्द रोहिणी खडसे यांनी सांगितली. खडसे यांनी पक्षबदल केल्यावर विविध ठिकाणी सत्कार व राष्ट्रवादीत पक्षप्रवेश कार्यक्रमात त्या सहभागी होत्या. यावेळी त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता सांगितली जात आहे.  

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here