जगातील ‘ही’ पाच ठिकाणे जेथे काम करत नाही गुरुत्वाकर्षण; वाचा रंजक माहिती

तुम्ही मी आणि सगळेच जमिनीवर का चालतो?… आता तुम्ही म्हणाल की पाय आहेत म्हणून… हे झालं सामान्य उत्तर आता विज्ञानाच्या अंगातून विचार करा…आता तुमचे उत्तर येईल की गुरुत्वाकर्षण आहे म्हणून. आजवर तुम्ही अशा एखाद्या ठिकाणी गेला आहात का जिथे गुरुत्वाकर्षण जाणवत नाही. असे ठिकाण जिथे धबधबा आहे आणि तेथिल पाणी वरच्या बाजूला जाते. असे ठिकाणी जिथे चढाला बंद केलेल्या गाड्याही चालतात. गुरुत्वाकर्षण शक्ती प्रत्येक गोष्टीला आपल्याकडे खेचून घेते. आज आपण अशा काही अद्भुत ठिकाणांविषयी जाणून घेणार आहोत जिथे गुरुत्वाकर्षण काम करत नाही.

१) १९३९ मध्ये यामिस्ट्री स्पॉट ठिकाणाचा शोध लागला. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात असणारे हे ठिकाण तेव्हाही प्रसिद्ध झाले पण लोकांना वाटे इथे काहीतरी जादुई शक्ती आहे. नंतर लक्षात आले की येथे चुंबकीय क्षेत्र खूप कमी प्रमाणात आहे, म्हणून येथे ग्रॅविटी पाहिजे तसे कार्य करत नाही. आज हे ठिकाणी पर्यटकांसाठी वैज्ञानिक खजिना आहे. इथे तुम्ही पाणी खाली फेकले तरी ते वर जाते.

२) दुसरे ठिकाण भारतातील आहे. जगभरातून लोक फिरण्यासाठी लदाखला जात असतात. लदाखमध्ये असणाऱ्या मैग्नेटिक हिल या ठिकाणी सुद्धा गुरुत्वाकर्षण शक्ती कमी आहे. मैग्नेटिक हिल या ठिकाणी प्रवासी वाहने २०-२५ किलोमीटर प्रती तासाच्या वेगाने आपोआप चालतात.

३) सर्वसाधारणपणे जगभरात उताराला वाहने लागली की आपोआप चालतात मात्र फ्लोरिडामध्ये एक ठिकाण असे आहे जिथे चढाला वाहने बंद केली तरीही आपोआप पुढे जातात. स्पूक हिल या ठिकाणीसुद्धा गुरुत्वाकर्षण कमी आहे.  

४) स्कॉटलंडमध्ये एक धबधबा आहे तिथे पाणी खाली न जतात वरती जाते. हे ठिकाण फॅरो वॉटरफॉल म्हणून ओळखले जाते.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here