त्यावरून ‘टाटा’ने उडवली ‘मारुती’ची खिल्ली; पहा नेमके काय केलेय ट्विट

ऑटो न्यूजमध्ये सध्या एक बातमी ट्रेंडमध्ये आहे. टी म्हणजे मारुती सुझुकी कंपनीची एस-प्रेसो ही कार सुरक्षिततेच्या बाबतीत सर्वाधिक तळाला आहे. भारतीय बाजारात दबदबा असलेल्या मारुती कंपनीला आणि तिच्या ग्राहकांना हा मोठा धक्का आहे.

त्यावरून आपल्या कार कशा पद्धतीने सुरक्षित आहेत हे सांगताना टाटा मोटर्स कंपनीने मारुतीच्या कराची वेगळ्या पद्धतीने खिल्ली उडवणारी इमेज शेअर केली आहे. ट्विटरवर टाटा मोटर्स यांनी कॉफीने भरलेला एक फुटका कप असलेली इमेज टाकली आहे. ज्यात कप फुटल्याने सर्व कॉफी खाली अस्ताव्यस्त पडलेली आहे.

याद्वारे टाटा मोटर्स यांनी संदेश दिला आहे की, आम्ही इतक्या लवकर तुटत नाही. इतकेच म्हणून त्यांनी योग्य असा संदेश दिला आहे. एकूण भारतीय ग्राहकांना आवडणाऱ्या मारुती कंपनीच्या कार सुरक्षिततेच्या आणि आरामदायी प्रवासाच्या बाबतीत मागे असल्याचे वेळोवेळी म्हटले जात होते. आता कार सेफ्टी प्रोग्राम ग्लोबल NCAP यांच्या अहवालाने यावर शिक्कामोर्तब झालेले आहे.

मारुतीच्या एस-प्रेसो कारला ज्यावेळी शून्य रेटिंग मिळाले त्याचवेळी त्याच श्रेणीतील टाटा कंपनीच्या टीयागो या कारला 4 रेटिंग मिळालेले आहेत. त्याचा गाजावाजा यानिमित्ताने टाटा मोटर्स करीत आहे. एकूणच ग्राहकांच्या पसंतीला पडणाऱ्या एस-प्रेसो कारच्या विक्रीत आता यामुळे कोणते बदल होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here