ब्रेकिंग : ‘त्या’ची कार धडकली थेट मक्का येथील मोठ्या मशिदीच्या दाराला..!

मुस्लीम समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या मक्का येथील मोठ्या मशिदीच्या थेट दाराला कार धडकावण्याची गंभीर घटना घडली आहे. त्या कारचालकाने नेमके असे कृत्य जाणीवपूर्वक केले की अजाणतेपणी हे समोर आलेले नाही. मात्र, यामुळे सोशल मिडीयामध्ये हा व्हिडिओ ट्रेंडमध्ये आलेला आहे.

नवभारत टाईम्स यांच्या शैलेश शुक्ला यांच्या बातमीमध्ये म्हटले आहे की, सौदी प्रेस एजन्सीने याबाबत माहिती दिली आहे. मागील शुक्रवारी ही घटना घडली. त्यामध्ये कारच्या चालकाने बेदरकारपणे कार थेट दरवाजाला धडकवण्यासाठी नेली. विशेष म्हणजे मध्ये असलेले अडथळेही त्याने धडाकवत थेट मुख्य दरवाजा गाठला.

सनकी आणि अविचारी असलेल्या या माणसाचे कृत्य असल्याचे पोलिसांनी प्रथमदर्शनी जाहीर केलेले आहे. 24 सेकंदाचा हा कारचा व्हिडिओ सध्या जगभरात ट्रेंडमध्ये आहे. अनेकांनी या दुर्दैवी घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. नमाज चालू असतानाच ही घटना घडली. मात्र, त्यामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही.

पोलिसांनी संबंधित कारच्या चालकास ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ही गोष्ट चुकीने घडल्याची शक्यता असल्याचे समजते. करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ही मशीद अनेक दिवस बंद होती. नुकतीच उघडण्यात आली असून मोजक्या लोकांना यामध्ये प्रवेश दिला जात आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

ता. क. : नवभारत टाईम्स यांची मूळ बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून पुढे जा.

https://navbharattimes.indiatimes.com/world/uae/saudi-arabia-man-crashes-car-into-gates-of-mecca-grand-mosque-see-video/articleshow/78967746.cms

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here