धक्कादायक : वाचा किम जोंगच्या खतरनाक डॉल्फिन आर्मीची माहिती; पहा काय करतेय उत्तर कोरिया

उत्तर कोरियाचा सनकी हुकुमशहा किम जोंग उन याचा आणखी एक धक्कादायक कारनामा पुढे आलेला आहे. अमेरिकेसह अवघ्या जगाच्या उरात धडकी भरवणाऱ्या या हुकुमशहाने आता थेट डॉल्फिन आर्मी तयार करण्याचे नियोजन केलेले आहे.

पाण्यातून होणारे हल्ले रोखण्यासाठी पाण्यातच सुरुंग निष्क्रिय करण्याचे महत्वाचे काम डॉल्फिन करू शकतात. तसेच पाण्याद्वारे देशात घुसखोरी करण्याच्या तयारीत असलेल्या जवानांचा पाण्यात जीव घेण्याचे कामही हे मासे करतात. अमेरिका आणि रशिया यांनी अशा पद्धतीच्या सेना तयार केलेल्या आहेत.

त्याच पावलावर पाउल टाकून आता किम जिंग याच्या देशानेही अशा पद्धतीची सेना उभारण्याचे काम हाती घेतले आहे. यामध्ये डॉल्फिन माशांना योग्य असे प्रशिक्षण देऊन लष्करीदृष्ट्या महत्वाच्या कामासाठी तय्यार केले जाते.

डॉल्फिन मासा हा एक मायाळू आणि हुशार असा जीव आहे. त्याचाच वापर नाविक दलासाठी सर्वप्रथम अमेरिकेने केला. मग, 1990 पासून रशियाही यावर संशोधन करून आपले डॉल्फिन सैन्य तयार करीत आहे. 2019 मध्ये रशियाचा असाच एक बेलुगा व्‍हेल मासा थेट नॉर्वे देशात सापडला होता. आताही उत्तर कोरियाने असे मासे तयार करण्याचे काम हाती घेतल्याचे अहवाल आलेले आहेत.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here