म्हणून संजय राऊत म्हणाले; देशात कोणीही सेक्युलर नाही, ‘ती’ एक प्रकारची शिवी

मुंबई : 

सेक्युलर ही एक प्रकारची शिवी आहे. त्याचा राजकारणात चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात आला आहे. सेक्युलर याच शब्दामुळे देशात हिंदू मुस्लीम अशी थेट विभागणी झाली. यामध्ये तुम्ही केवळ हिंदूंना शिव्या दिल्या की तुम्ही अधिक सेक्युलर आहात असं म्हटलं जातं. हे चुकीचं आहे, असे विधान शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

यावेळी ते स्टँडअप कॉमेडिअन कुणाल कामरा याने आपल्या ‘शट अप या कुणाल’ या शोमधील मुलाखतीत बोलत होते. पुढे ते म्हणाले की, ‘या देशात कोणीही सेक्युलर नाही. जे आपण सेक्युलर असल्याचं म्हणातात तेच सर्वाधिक धर्मांध असतात. सेक्युलर ही एक प्रकारची शिवी आहे. त्याचा राजकारणात चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात आला.

पुढे बोलताना त्यांनी बाळसाहेब ठाकरेंच्या विचारांची आठवण सांगितली. राऊत म्हणाले की, मुस्लीम या देशाचेच नागरिक आहेत. परंतु काही राजकीय पक्ष त्यांच्या मतांचं राजकारण करत असतात. त्यामुळे नुकसान हे देशाचं होतंच पण त्यांचंही नुकसान होतं. कायम ते अंधारात राहावंस आणि त्यांनी आपल्या मागे यावं अशी त्या राजकीय पक्षांची इच्छा असते. ज्या दिवशी हे मतांचं राजकारण थांबेल त्यादिवशी देश पुढे जाईल असं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here