म्हणून पुन्हा वाढू शकतो चीन-भारत तणाव : चीनच्या ‘त्या’ दुखत्या नसेवर बोट ठेवत भारतीय विदेश मंत्री म्हणाले…

दिल्ली :

पुन्हा एकदा भारत-चीन तणाव वाढण्याची चिन्हे आहेत. लडाखमधील सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी चीनला स्पष्ट आणि गंभीर संदेश दिला आहे. दक्षिण चीन समुद्रात प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाचा आदर केला गेला पाहिजे, असे भारताने म्हटले आहे.

ब्रह्मपुत्र नदीवर चीन नवीन धरण बांधण्याचा विचार करीत आहे तो त्याच्या थ्री जॉर्ज धरणासारखा असेल. तथापि, चीनने अद्याप या प्रकल्पासंदर्भात कोणतेही बजेट जाहीर केलेले नाही. तज्ज्ञांच्या मते चीनच्या या नवीन प्रकल्पामुळे भारताशी असलेला वाद आणखी वाढू शकतो. अरुणाचल प्रदेश ओळखण्यास चीन सुरुवातीस नकार देत आहे. चीन या धरणांचा उपयोग आपल्या मोक्याच्या फायद्यासाठी करेल अशी शक्यता आहे.

दक्षिण चीन समुद्रामध्ये दादागिरी दाखवणाऱ्या चीनला भारताने स्पष्ट शब्दात थेट संदेश दिला आहे. दक्षिण चीन समुद्रावरील विश्वास नष्ट करणाऱ्या ‘कृती’ आणि ‘घटना’ यावर भारताने शनिवारी चिंता व्यक्त केली. त्याच वेळी भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन, प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाचा आदर करण्याचे महत्त्व यावर जोर दिला आहे.

दक्षिण चीन समुद्र हा हायड्रोकार्बन सारख्या नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध आहे आणि हीच चिनी ड्रॅगनची दुखरी नस आहे. दुसरीकडे, व्हिएतनाम, ब्रुनेई आणि फिलिपिन्स सारख्या दक्षिण चीन समुद्राला लागून असलेले इतर देशदेखील आपल्या नैसर्गिक संपत्तीवर दावा करतात. कोरोना विषाणूच्या साथीचा फायदा घेऊन चीनने गेल्या काही महिन्यांत आपल्या आक्षेपार्ह लष्करी कामात वाढ केली आहे. ड्रॅगनच्या या हालचालीमुळे जगभर चिंता वाढली आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here