धक्कादायक : संशोधकांनी केला ‘हा’ महत्वाचा दावा; पहा काय म्हणतेय नासाही

पृथ्वीवर सध्या मानवजातीला अनेक गंभीर संकटांना सामोरे जावे लागत आहे. आधुनिकीकरण करण्याच्या नावाखाली मानवाने निसर्गात केलेल्या हस्तक्षेपामुळे आता मानवाला दुसरे एखादे ठिकाणही राहण्यासाठी खुणावत आहे. अशावेळी अमेरिकन स्पेस रिसर्च संस्था नासा यांनी खास महत्वाचा दावा केला केला आहे.

Kepler Space Telescope यांच्या निरीक्षण आणि त्यानुसार आलेल्या निष्कर्षावर आधारित अहवाल प्रसिद्ध झालेला आहे. त्यानुसार असे स्पष्ट झालेले आहे की, एकट्या आपल्या आकाशगंगेत किमान 30 कोटी असे ग्रह आढळून येतात की ज्यावर पाणी आहे. अर्थातच इथे जीवन असल्याचाही त्यातून निष्कर्ष पुढे येत आहे.

सूर्यापासून पृथ्वी ज्या अंतरावर आहे. साधारणपणे त्याच अंतरावरील पाणी व जीवन असू शकणारे ग्रह याद्वारे शोधले जात आहेत. Astronomical Journal यामध्ये याचा सविस्तर अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार 75 ग्रह निवडले आहेत ज्यावर जीवसृष्टी असू शकते.

आता त्या सर्व ग्राहांचे सूक्ष्म निरीक्षण करण्याचे काम संशोधकांनी आणि नासा संस्थेने हाती घेतले आहे. अशा पद्धतीने कोणत्या ग्रहावर कोणत्या पद्धतीचे जीवन आहे आणि त्यामध्ये मानव जगू शकतो किंवा नाही याचाही वेध घेतला जाणार आहे. एकूणच आशादायक आणि सुखद धक्का देणारी ही बातमी आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here