मंदिरे, प्रार्थनास्थळे खुली; वाचा, काय आहेत गाइडलाइन्स

मुंबई :

लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उघडला जात आहे. विविध सार्वजनिक ठिकाणे उघडली जात आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेला मोठी भेट दिली. पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरेंनी जाहीर केले आहे. मात्र या स्थळी जाताना काही गाइडलाइन्स पाळणे गरजेचे आहे.

राज्य सरकारकडून गाइडलाइन्सही जारी करण्यात आल्या आहेत. या गाइडलाइन्सचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश सर्व धार्मिक स्थळांना देण्यात आलेले आहेत.

अशा आहेत गाइडलाइन्स :-

– कंटेन्मेंट झोनमधील धार्मिक स्थळे तूर्त बंदच राहणार आहेत. कंटेन्मेंट झोनबाहेरील धार्मिक स्थळेच उघडण्यास परवानगी असेल.
– ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, तसेच १० वर्षांखालील लहान मुलांना प्रवेश धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश देण्याचे टाळावे.
– दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फुटांचे अंतर राखणे बंधनकारक असेल.
– मूर्ती, पुतळे वा पवित्र धर्मग्रंथाला स्पर्श करण्याचे टाळावे.
– प्रसादाचे वाटप तसेच पवित्र जलाचे शिंपण टाळावे. ज्या ठिकाणि अन्नदान होते अशा ठिकाणी प्रामुख्याने सुरक्षित वावर राखला जाईल याची काळजी घ्यावी.
– परिसरात कोरोना विषयी जनजागृती करणारे माहिती फलक लावावेत. मार्गदर्शक सूचनांची माहिती देणारी एखादी ऑडिओ कॅसेटही लावली जावी.

– प्रार्थनास्थळांमध्ये असलेली मोकळी जागा, व्हेंटिलेशनची उपलब्धता या सर्व गोष्टींचा अभ्यास करून किती गर्दी प्रार्थनास्थळांमध्ये असायला हवी याचे नियोजन केले जावे.
– अन्य ठिकाणी जशी तोंडावर मास्क, सॅनिटायझेशन, सुरक्षित वावर याप्रकारची काळजी घेतली जाते, तशीच काळजी येथेही घ्यावी व अन्य दक्षताही बाळगावी.
– प्रार्थनास्थळांमध्ये जाण्याआधी चप्पल, बूट आपापल्या गाडीमध्येच काढून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसा पर्याय नसल्यास प्रत्येकाने आपले, तसेच आपल्या कुटुंबीयांच्या चपला, बूट स्वतःहून वेगळ्या ठिकाणी ठेवता येईल, अशी व्यवस्था करावी.
– मंदिरांच्या बाहेर पार्किंगमध्ये गर्दी होणार नाही, परिसरातील इतर दुकाने, कॅफेटेरियामध्ये देखील सुरक्षित वावर राखला जाईल याची काळजी घ्यावी.
– प्रार्थनास्थळांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येकाने हात आणि पाय स्वच्छ धुणे आवश्यक.

संपादन: स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here