क्रॅश टेस्टमध्ये मिळालेत 5 स्टार; ‘या’ 2 ठरल्या भारतातील सर्वात सुरक्षित कार

दिल्ली :

ग्बोबल NCAP (New Car Assessment Programme) द्वारे टेस्ट केल्यानंतर मारुती सुझुकीच्या एस-प्रेसो या कारला शून्य रेटिंग देण्यात आलं आहे. तसेच मारुती सुझुकी एस-प्रेसो ही कार सुरक्षित नसल्याचं प्रमाणपत्रही देण्यात आलं. त्यानंतर वाहन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. अगदी सामान्य माणसेही आपल्या गाडीला क्रॅश टेस्टमध्ये किती रेटिंग आहे ते चेक करू लागली. आता लोकांना मारुती सुझुकीच्या कोणत्या कारला किती रेटिंग आहे, याची माहिती मिळवण्याची उत्सुकता लागली आहे. तसेच सर्वच चारचाकी वापरणारे ग्राहक काळजीपोटीही आपापल्या गाड्यांचे रेटिंग शोधत आहेत. 

आता कोणत्या गाडीवर विश्वास ठेवायचा असा प्रश्न सामान्य माणसे उपस्थित करत आहेत. भलेही पैसे जास्त जाऊ द्या पण चांगली रेटिंग असणारी गाडी मिळाली पाहिजे, अशाही चर्चा होऊ लागल्या आहेत. म्हणूनच आज आम्ही आपल्याला क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार मिळालेल्या आणि भारतातील सर्वात सुरक्षित कार ठरलेल्या गाड्यांविषयी सांगणार आहोत.

  • १) Mahindra XUV300 ही एक दमदार गाडी आहे. 5 स्टार रेटिंग प्राप्त असलेली ही गाडी पेट्रोल आणि डिझेल व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यात अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, हीटेड ओआरव्हीएम, ISOFIX चाईल्ड सीट अँकर, एअरबॅग्ज, ईबीडी, कॉर्नर ब्रेकिंग कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट, फ्रंट पार्किंग सेन्सर, फ्रंट आणि रीअर फॉग लाईट असे सेफ्टी फीचर्स देण्यात आलेले आहेत.
  • २) Tata Altroz या गाडीलाही ग्लोबल एनसीएपी टेस्टमध्ये 5 स्टार रेटिंगही मिळाली आहे. यात ड्युअल एअरबॅग, कॉर्नरिंग ब्रेक कंट्रोल, ईबीडी असलेले एबीएस, रिअर पार्किंग सेन्सर्स, स्पीड वॉर्निंग अलर्ट सारखे फीचर्स देण्यात आहेत आहेत. 
  • संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here