दिवाळीनंतरही सलग 4 दिवस बंद राहणार बँक; वाचा, कधी-कधी असतील सुट्ट्या

मुंबई :

सध्या सण- उत्सवाचे दिवस चालू आहेत. आपण कामाच्या गडबडीत बँकांची कामे विसरून जातो. आणि जेव्हा नेमका आपल्या वेळ सापडतो तेव्हा बँक बंद असते. येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात अनेक सण आहेत. रविवार, शनिवार आणि दिवाळी, लक्ष्मीपुजन यासह गुरु नानक जयंती असल्यामुळे बँकांना अनेक दिवस सुट्टी असणार आहे. आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटनुसार, संपूर्ण देशात बँकांना नोव्हेंबर महिन्यात 15 दिवसांची सुट्टी असेल. रिझर्व्ह बँकेच्या मते, असेही होऊ शकते की, एखाद्या राज्यात बँका बंद असतील आणि त्याचवेळी इतरत्र उघडया असू शकतात.

15 ला रविवार तर 16 नोव्हेंबरला भाऊबीजमुळे देशातील अनेक राज्यांमध्ये बँका बंद असणार आहेत. 20 आणि 21 नोव्हेंबर रोजी बिहार आणि झारखंडमध्ये छठ पूजा असल्यामुळे बँका बंद राहतील. त्याचबरोबर रविवारी 22 नोव्हेंबरपासून सर्व राज्यांमध्ये बँका बंद असणार आहेत.

28 नोव्हेंबर हा चौथा शनिवार त्याचबरोबर, रविवारी 29 नोव्हेंबरलाही सगळीकडे बँक बंद असतील. यानंतर 30 नोव्हेंबर रोजी गुरु नानक जयंती आणि कार्तिक पोर्णिमा आहे. त्यामुळे या दिवशीही बँकेला सुट्टी असेल.

वाचा नोव्हेंबरमध्ये कुठे आणि कधी आहेत सुट्ट्या :-

– 15 नोव्हेंबर – रविवारी – देशभरातील बँकांना सुट्टी

– 16 नोव्हेंबर – दिवाळी (बलिप्रतिपदा) / लक्ष्मी पूजा / भाऊबीज/ चित्रगुप्त जयंती, (अहमदाबाद, बेलापूर, बेंगलुरू, गंगटोक, कानपूर,

लखनऊ, मुंबई, नागपूर)

– 17 नोव्हेंबर – लक्ष्मीपूजा / दिवाळी /

– 18 नोव्हेंबर – छठ पूजा (गंगटोक)

– 20 नोव्हेंबर – छठ पूजा (पाटणा, रांची)

– 21 नोव्हेंबर – छठ पूजा (पटणा)

– 22 नोव्हेंबर – रविवारी (देशभरातील बँका बंद)

– 23 नोव्हेंबर – सेन्ग कुट्सनेम (शिलाँग)

– 28 नोव्हेंबर – चौथा शनिवार (सर्वत्र)

– 29 नोव्हेंबर – रविवारी (सर्वत्र)

– 30 नोव्हेंबर – गुरु नानक जयंती / कार्तिक पोर्णिमा (ऐजवाल, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंडीगड, देहरादून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पटना, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर)

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here