भारताचा नकार; मात्र चीनसह ‘त्या’ 15 देशांनी केली ‘त्या’ महत्वाच्या करारावर स्वाक्षरी

भारत आणि चीन यांच्यातील संबंध नाजूक बनलेले आहेत. अशावेळी भारत आता खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होण्याच्या तयारीत आहे. त्याचेवेळी भारत सदस्य असलेल्या आसियान संघटनेच्या सदस्यांनी चीनसह एका महत्वाच्या आर्थिक करारावर स्वाक्षरी केली आहे.

क्षेत्रीय व्यापक आर्थिक साझेदारी (RCEP) असे या महत्वाच्या कराराचे नाव आहे. भले जगभरातील फ़क़्त 15 देशांनी यावर स्वाक्षरी केलेली असेल. मात्र, एकूण जगाच्या अर्थव्यवस्थेच्या आणि एकूण लोकसंख्येच्या दृष्टीने हे 15 देश खूप महत्वाचे आहेत. त्यानुसार आता भारताने स्वाक्षरी न करताही हा जगातील एक महत्वाचा करार सत्यात उतरत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच या करारावर स्वाक्षरी न करण्याची भारताची भूमिका जाहीर केली आहे. यामध्ये चीन देशासह जापान, दक्षिण कोरिया, न्यूजीलैंड, ऑस्ट्रेलिया दक्षिण-पूर्व एशियाई शिखर संमेलनाच्या सदस्यांनी सहभाग घेऊन स्वाक्षरी केली आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी भारताला सर्व दरवाजे खुले असल्याचे या करारातील सर्व सदस्य राष्ट्रांनी म्हटलेले आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here