मागील वर्षीपेक्षा यंदा ‘या’ कंपनीच्या कार विक्रीत 12 टक्क्यांनी वाढ; वाचा, कशी आली दिवाळीत तेजी

मुंबई :

कोरोनामुळे अर्थव्यवस्था कोलमडून पडली होती. ४-५ महिन्यापूर्वी एक वेळ अशीही होती की लोकांना नेमकं कमवायचं काय? असा प्रश्न होता. ही परिस्थिती सुधारायला वेळ लागेल, आर्थिक संकटातून सावरायला वेळ लागले, असे मत तज्ञां मंडळी व्यक्त करत होते. मात्र आता लोकांची दिवाळी जोरात सुरु आहे. अर्थात दरवर्षीसारखा उत्साह यावर्षी नाही. असे असले तरी बाजार अपेक्षेपेक्षा जोरात चालू आहे. अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे विविध संकेत मिळत आहेत. अशातच मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी धनत्रयोदशीला टोयोटा किर्लोस्कर मोटरगाडीची विक्रीत 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हाही शुभसंकेत आहे.

यावर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी गाड्यांच्या विक्रीत मागील वर्षीच्या तुलनेत 10 ते 13 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. यावर्षी धनत्रयोदशीचा उत्सव दोन दिवस साजरा करण्यात आला. या काळात टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीच्या वाहन विक्रीत वाढ झाली. ही वाढ मागील वर्षीच्या विक्रीच्या तुलनेत 12 टक्के अधिक आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यातील गाड्यांच्या विक्रीचा वेग ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत जास्त होईल, अशी कंपनीला आशा आहे, अशी माहिती टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष नवीन सोनी यांनी दिली.

प्रामुख्याने मारुती सुझुकी, ह्युंदाई, टाटा मोटर्स आणि किया मोटर्स या कंपन्यांचा बाजारात बोलबाला पाहायला मिळाला. मात्र इतर कंपन्यांच्या विक्रीत घट झाली आहे. 

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here