जाणून घ्या क्रॅश टेस्टमध्ये मारुतीसुझुकीच्या कोणत्या कारला आहे किती रेटिंग; एस प्रेसोला आहेत 0 % रेटिंग

मुंबई :

मारुती सुझुकी ही कंपनी सामान्य लोकांची मानसिकता लक्षात घेऊन कमी किमतीत जास्त मायलेज असणाऱ्या गाड्या तयार करते. सध्या मारुतीच्या अनेक गाड्यांची बाजारात चलती आहे. अशातच २ दिवसांपूर्वी मारुती सुझुकीसाठी एक धक्कादायक बातमी आली होती. ग्बोबल NCAP (New Car Assessment Programme) द्वारे टेस्ट केल्यानंतर मारुती सुझुकीच्या एस-प्रेसो या कारला शून्य रेटिंग देण्यात आलं. तसेच मारुती सुझुकी एस-प्रेसो ही कार अजिबात सुरक्षित नसल्याचं प्रमाणपत्रही देण्यात आलं होत.

दरम्यान आता लोकांना मारुती सुझुकीच्या कोणत्या कारला किती रेटिंग आहे, याची माहिती मिळवण्याची उत्सुकता लागली आहे. तसेच मारुती सुझुकीचे अनेक ग्राहक काळजीपोटीही रेटिंग शोधत आहेत. मारुती सुझुकीच्या एस-प्रेसोसह एकूण ३ गाड्यांचे परीक्षण करण्यात आले. यात ह्युंदाई ग्रँड i10, किआ सेल्टोस याही गाड्यांचे परीक्षण झाले. ग्बोबल NCAP द्वारे यावेळी तीन मेड इन इंडिया कार्सचे परिक्षण करण्यात आले. त्यामध्ये ह्युंदाई ग्रँड i10 या कारला 2 स्टार, किआ सेल्टोस या कारला 3 स्टार आणि एस-प्रेसो या कारला 0 स्टार देण्यात आले.

मारुतीच्या सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही विटारा ब्रेझाला क्रॅश टेस्टमध्ये 4 स्टार मिळाले. अर्टिगात 7 लोकांना बसता येऊ शकते. या कारला ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये 3 स्टार मिळाले आहेत. स्विफ्ट ही मारुतीची लोकप्रिय हॅचबॅक कार आहे, ज्यात एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये 2 स्टार मिळाले. ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये न्यू जनरेशन वॅगनआरला 2 स्टार मिळाले. (माहिती स्रोत :- नवभारत टाईम्स)

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here