धक्कादायक : क्रॅश टेस्टमध्ये मारुतीच्या फक्त एस प्रेसोच नाही तर ‘या’ २ गाड्यांनाही मिळालेत 0 स्टार

मुंबई :

मारुती सुझुकीच्या एस प्रेसो कारला क्रॅश टेस्टमध्ये शून्य रेटिंग दिलं गेलं. त्यानंतर वाहन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. अगदी सामान्य माणसेही आपल्या गाडीला क्रॅश टेस्टमध्ये किती रेटिंग आहे ते चेक करू लागली.  ग्बोबल NCAP (New Car Assessment Programme) द्वारे गाड्यांच्या क्रॅश टेस्ट केल्या गेल्या. दरम्यान अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मारुती सुझुकीच्या फक्त एस-प्रेसोलाच नाही तर इतर दोन गाड्यांनाही 0 स्टार मिळाले आहेत.

मारुतीच्या ईको आणि सेलेरियो या २ गाड्यांनाही 0 स्टार मिळाले आहेत. ईको या गाडीने भारतात 10 वर्षे पूर्ण केली आहेत. क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० स्टार मिळवले आहेत मुलाच्या सुरक्षेत 2 गुणांची नोंद झाली आहे. केवळ एस-प्रेसो आणि इकोच नाही तर मारुती सेलेरिओलाही शून्य स्टार रेटिंग मिळाली आहे. अडल्ट प्रोटेक्शनमध्ये 0 आणि चाइल्ड ऑक्यूपेंसीत 1 गुण मिळविला आहे. कारची किंमत 4.41 लाख रुपये पासून सुरू होते आणि ती 5.68 लाखांपर्यंत जाते.

मारुती सुझुकीच्या एस-प्रेसोसह एकूण ३ गाड्यांचे परीक्षण करण्यात आले. यात ह्युंदाई ग्रँड i10, किआ सेल्टोस याही गाड्यांचे परीक्षण झाले. ग्बोबल NCAP द्वारे यावेळी तीन मेड इन इंडिया कार्सचे परिक्षण करण्यात आले. त्यामध्ये ह्युंदाई ग्रँड i10 या कारला 2 स्टार, किआ सेल्टोस या कारला 3 स्टार आणि एस-प्रेसो या कारला 0 स्टार देण्यात आले. (वृत्त स्रोत :- नवभारत टाईम्स)

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here