बॅटरीला लागतेय आग; ‘या’ कंपनीने परत मागवल्या तब्बल 69 हजार कार; वाचा काय आहे विषय

दिल्ली :

जनरल मोटर्स जगभरातील सुमारे 69 हजार शेवरलेट बोल्ट इलेक्ट्रिक कारला परत मागवत आहेत. ही वाहने परत मागवण्याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये 5 वाहनांमध्ये असलेल्या बॅटरीला आग लागली. त्यामुळे थेट कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र धुरामुळे दोन लोकांचे आरोग्य खराब झाले आहे. विशेष गोष्ट म्हणजे कंपनीला अद्यापही आग लागण्याचे कारण कळलेले नाही.

इंजिनियर्स बॅटरीमध्ये लागलेल्या आगीचे कारण शोधण्याचा प्रयत्न करीत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. इंजिनियर्स बॅटरीमध्ये लागलेल्या आगीचे कारण शोधण्याचा प्रयत्न करीत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. बोल्टचे मुख्य कार्यकारी अभियंता जेसी ऑर्टेगा यांनी सांगितले की जोपर्यंत या समस्येवर कायमस्वरूपी उपाय निघत नाही तोपर्यंत तात्पुरता तोडगा शोधला जाईल. सर्व विक्रेत्यांना असे सॉफ्टवेअर इंस्टॉल करण्यास सांगितले जाईल, ज्यामुळे बॅटरीची चार्जिंग मर्यादा जास्तीत जास्त 90 टक्क्यांपर्यंत वाढेल. म्हणजे या बॅटरीज 90 टक्क्यांपेक्षा अधिक चार्ज होणार नाही.

जनरल मोटर्स जी वाहने परत मागवत आहेत ती 2017 ते 2019 दरम्यान बनविली आहेत. यापैकी 51 हजार वाहने अमेरिकेची आहेत. अमेरिकेच्या नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या प्रशासनानेही या गाड्यांना आग का लागली याची चौकशी केली होती, या चौकशीच्या घोषणेच्या एका महिन्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला. एजन्सीने गेल्या महिन्यात सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की कार पार्किंगमध्ये असताना या वाहनांच्या पुढच्या सीटला आग लागली आणि तेथे कोणीच नव्हते.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here