दिवाळीला खाता येईना गोड; मग अशा पद्धतीने घरीच बनवा शुगर फ्री मिठाई

दिवाळी हा गोडाधोडाचा आणि आनंदाचा सण आहे. वर्षातून येणाऱ्या या सणालासुद्धा काही मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना मनसोक्त मिठाई खाता येत नाही. म्हणून आज आम्ही आपल्याला घरच्या घरी शुगर फ्री मिठाई कशी बनवायची ते सांगणार आहोत.

  1. बदाम, पिस्ता, काजू, खजूर आणि अंजीर हे एकत्र करून पिठाचा गोळा तयार करा. त्याचबरोबर लाडूमध्ये गोडपणा येण्यासाठी मधाचा वापर करून तुम्ही लाडू वळू शकता. अशा पद्धतीने आपली पहिली शुगर फ्री बर्फी तय्यार… ड्रायफ्रुट आणि खजूर लाडूची ही रेसिपी वाचा आणि ट्राय करा.
  2. सीताफळ, गूळ पावडर, नारळाचं दूध आणि विविध ड्रायफ्रूट वापरून खीर तयार करू शकता. बदाम आणि पिस्ता वापरून त्याची चव आणखी वाढवा. सीताफळ खीर तयार…
  3. भाजलेले आणि बारीक केलेले बदाम वापरून तुम्ही ही बर्फी तयार करू शकता. यात खवा वापरून तुम्हाला हव्या त्या आकाराची बर्फी तयार करू शकता. ही बर्फी ओव्हनमध्ये बेक करून तयार करू शकता. आपली शुगर फ्री बदामाची बर्फी खाण्यासाठी रेडी…
  4. नारळाच्या दुधात शिजवलेल्या तांदळाबरोबर गवती चहा, लिंबाची पानं, दालचिनी, वेलची आणि जायफळचा सुगंध तुम्हाला एक वेगळीच अनुभूती देतील. त्याचबरोबर यात टाकलेल्या पाईनॅपलमुळे याचा स्वाद अधिकच खुलून येतो. ही रेसिपी आहे. पायनॅपल राईस पुडिंगची…
  5. गाजर हलवा बनवा फक्त त्यात साखरेऐवजी गुळ किंवा मध घाला. शुगर फ्री गाजर हलवा तयार….

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here