आज मधुमेह दिनाच्या निमित्ताने जाणून घ्या ‘ही’ मधुमेहाची लक्षणे; वेळीच ओळखा धोका

आज जगभरात मधुमेह दिन जनजागृतीसाठी साजरा केला जातो. भारतात तर लठ्ठपणा आणि मधुमेहाचे आजार असणारे लोक फुटाफुटावर दिसतील. बदलती जीवनशैली, बैठे काम करण्याची पद्धत, पौष्टिक नसणारा आहार, आणि व्यायामाचा अभाव यामुळे सध्या वृद्धांसह तरुणाईसुद्धा मधुमेहाने ग्रासलेली आहे. बहुतांश तरुणांना मधुमेह आणि रक्तदाबाचा अगदी कमी वयात त्रास आहे. परिणामी अनेक व्यक्तींना हृदयरोगाचाही त्रास होतो.  कोरोनाच्या संकटात मधुमेहींना संक्रमणाचा जास्त धोका असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मधुमेहाची लक्षणे ओळखून ती दिसत असल्यास योग्यवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

अशी आहेत लक्षणे :-

  • भूक लागणे आणि थकवा जाणवणे ही प्रमुख लक्षणे
  • सारखी तहान लागते आणि पेशींना ग्लुकोज मिळत नसल्याने सारखा थकवा जाणवतो.
  • लघवीचे प्रमाण वाढणे
  • घशाला कोरड पडते. तोंड कोरडे पडते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने घशाला नेहमी कोरड जाणवते.
  • शरीरातील साखर वाढल्यास अचानक धूरकट दिसू लागते.
  • काहीजणांना डोळ्यांवर सूजही येते.
  • वजन कमी होण्यास सुरुवात    

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here