टिकटॉकप्रेमींसाठी आनंदाची बातमी : पब्जीपाठोपाठ टिकटॉकचाही कमबॅक; वाचा, काय आहेत शक्यता

दिल्ली :

आता पब्जी ही एका कोरियन कंपनीला हाताशी धरून भारतात कमबॅक करण्याची शक्यता आहे. अशातच पब्जीपाठोपाठ टिकटॉकही पुन्हा भारतात सुरु होऊ शकते. यावर्षी जूनमध्ये टिकटॉकवर बंदी घालण्यात आली होती.  टिकटॉक इंडियाचे अधिकारी आता पुन्हा भारतात टिकटॉक स्थापनेसाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. दरम्यान टिकटॉक इंडियाचे प्रमुख निखिल गांधी यांनी पत्र लिहून आपल्या कर्मचार्‍यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला आहे. गांधी यांनी म्हटले आहे की, मला आशा आहे की भारतात टिकटॉकच्या बाजूने एक सकारात्मक वातावरण तयार होईल आणि कोट्यावधी वापरकर्ते पुन्हा त्याचा वापर करण्यास सक्षम होतील.

दरम्यान पुढे बोलताना निखील गांधी यांनी म्हटले आहे की, टिकटॉक भारतीय नियम व कायद्यांचे पालन करणार आहे. तसेच यावेळी टिकटॉक आपल्या ग्राहकांच्या सुरक्षा आणि गोपनीयतेची खास काळजी घेईल.

अलिकडच्या काळात टिकटॉक इंडियाने आपले कामकाज पुन्हा सुरू करण्यासाठी केवळ स्पष्टीकरण जारी केले आहे. एवढेच नाही तर भविष्यकाळात सरकारला सहकार्य करण्यास पूर्णपणे तयार असल्याचेही त्यांनी आश्वासन दिले आहे. टिकटिकॉला आशा आहे की ते भारतात पुन्हा कामकाज सुरू करू शकतील.

नेमकं काय झालं होतं प्रकरण :-

भारत-चीन सीमेवर वाढत्या आणि रक्तरंजित संघर्षात भारतीय सैनिक शहीद झाल्यानंतर जूनमध्ये जेव्हा दोन देशांमधील परिस्थिती अधिकच बिघडली. भारत-चीन सीमाप्रश्नी वाद चालू होता. अशातच भारताचा डेटा हा सुरक्षा आणि गोपनीयतेच्या प्रश्नांनी वेढलेला होता. त्यामुळे माहिती सुरक्षा आणि गोपनीयता हे कारण सांगत टिकटॉक बंदी घालण्यात आली होती.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here