तर रक्तबंबाळ व्हाल; प्रविण दरेकरांचा संजय राऊतांना इशारा

मुंबई :

राज्यात कोणतंही ऑपरेशन होणार नाही. विरोधकांनी गेले वर्षभर अनेक ऑपरेशन केले. पण या सरकारला साधं खरचटलं सुद्धा नाही, असे म्हणत शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोला हाणला. याच पार्श्वभूमीवर  ‘आम्ही ऑपरेशन लोटसबाबत काहीच बोललो नाही. पण भाजपनं ठरवलं तर खरचटायचं सोडा, रक्तबंबाळ व्हाल’, असा इशारा भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिला.

‘महाविकासआघाडीचं सरकार आम्ही एक वर्ष चालवलं आहे, असे मघाशी संजय राऊत म्हणाले. राऊतांना माध्यमांशी बोलल्याशिवाय चैन पडत नाही. पण गेल्या वर्षात तुम्ही काय केलं?’ असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

‘ऑपरेशन लोटस बाबत आम्ही काहीच बोललो नाहीत. भाजपनं ठरवलं तर तुम्ही रक्तबंबाळ व्हाल, खरचटायचं सोडाच. बोलायला फक्त संजय राऊतांनाच येत नाही. उद्या सगळ्यांनी तोंड उघडलं तर थडगी काय आणि दुसरं काय हे सगळं समजेल. त्यामुळे कोणी कोणाला आव्हान देऊ नये आणि आव्हानाच्या भाषा करुच नयेत,’ असा टोलाही प्रवीण दरकेरांना लगावला.

नेमकं काय म्हणाले होते राऊत :-

राज्यात कोणतंही ऑपरेशन होणार नाही. विरोधकांनी गेले वर्षभर अनेक ऑपरेशन केले. पण या सरकारला साधं खरचटलं सुद्धा नाही. अनेक संकटांचा सामना करत ठाकरे सरकारने एक वर्षाचा कार्यकाळ चांगल्या प्रकारे पूर्ण केला. महाराष्ट्रासाठी आणि सरकार साठी शुभ दिवस आज पासून सुरु होतील. महाराष्ट्रातील सरकार 5 वर्ष स्थिरच राहील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहतील.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here