पदवीधरांसाठी सुवर्णसंधी; एसबीआयमध्ये ‘या’ पदांसाठी भरती, असा करा अर्ज

मुंबई :

सध्या जगभरात लोकांवर आर्थिक संकट आलेले आहे. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. तसेच अनेक कर्मचाऱ्यांच्या पगारातही कपात झाली आहे. उद्योग–धंदे करणारे छोटमोठे व्यावसायिकही अडचणीत आहेत. एकूण जगभरात अशी परिस्थिती असताना नोकरीची मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर यासंदर्भातील नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. इच्छुक उमेदवार हे नोटिफिकेशन पाहून नोकरीसाठी अर्ज करू शकतात. आजपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

अशी होईल निवड :-

साधारण ३ टप्प्यात परीक्षा होईल – पूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखती

परीक्षेची माहिती :-

पूर्व परीक्षा १०० गुणांची एमसीक्यू – इंग्रजी, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग ऍबिलिटी

मुख्य परीक्षा – २०० गुण

या आहेत अटी :-

उमेदवार शिक्ष पात्रता – पदवीधर

वयोमर्यादा – २१ ते ३० वर्षे  (आरक्षित प्रवर्गांसाठी सवलत लागू)

प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी ३१ डिसेंबर, २, ४ आणि ५ जानेवारीला पूर्व परीक्षा होईल. पूर्व परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण होणारे सर्व उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील. मुख्य परीक्षा २९ जानेवारी २०२१ रोजी होईल.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here